४०५. साहाय्यार्थ धावा करणे

मराठी

४०५. साहाय्यार्थ धावा करणे हि विरहाग्नीची ज्वाला भयंकर भारी, ये, प्रभो, धाव मी जळतो हिजमाझारी ... ध्रु दिनरजनी उठतां, बसतां, खातां, पितां, मज चैन नसे रे कार्ये करितां, ख्रिस्ता, तुज पाहुं कोठें? राया, धाव रे मज सत्वर अपुल्या पाया दवा रे तुजवांचून जीवित वायां पाव रे हा विरह करितो राख तनूची सारी, ये, पतितपावना, ये मजला मिठी मारी ... १ विष कालविले मम अग्नी ताव विरहाने कीं शयनी रचिले जळत निखोर ह्यानें हा जीव वाटतो वैरी, धाव रे हा देह नको जड भारी, धाव रे तीळ नसे सौख्य संसारी, धाव रे तुजवांचून नाही, नलगे मज कैवारी, ये, पतितपावना, ये मजला मिठी मारी ... २ मी कसाही असलो, तरी तुझा मी दास, तूं निधी क्षमेचा, कसा विसरशीं ह्यास ? मी योग्य न तुझिया प्रेमा, प्रेमला, मी जिवंत आधीं रिकामा, निर्मला, त्वां घ्यावें नच मम नामा, उज्ज्वला तें प्रेम तुझें परी अशांच नीचा तारीं ये, पतितपावना, ये मजला मिठी मारी ... ३ --- ना.वा.टिळक