मराठी
४०६. संकटसमयी केलेला धावा
प्रभुराया, धाव माझ्या
गुरुराया, धाव रे ... ध्रु
भवसिंधु खवळला किती
भीती वाटती, भडकली मती
पिउनियां वारें,
प्रिय येशू , धाव रे ... १
मी दीन, बुद्धिबलहीन,
जळावीन मीन तास तुजविण,
शून्य मज सारें,
प्राणेशा धाव रे ... २
जीवन सर्वसाधना,
अक्षया धना अगा मन्मना,
मायबापा रे
प्रिय बंधो, धाव रे ... ३
तूंच मणी, तूंच रे जनीं,
तूंच निर्जनी पुढें निशिदिनी
राहीं, सख्या रे,
सर्वस्वा, धाव रे ... ४
--- ना.वा.टिळक