प्रभुपद दृढ धरणे

मराठी

४०८ प्रभुपद दृढ धरणे प्रभुपद दृढ धर धर रे मना धर रे मना ! बा धर रे मना ! ...ध्रु ऐक ऐक नाहीं तर श्रमूनीयां जन्मभर अंति तूंच साधीशील आत्महनना ... १ स्वप्नमुगध समजून स्वप्न हेंच जागेपण, किती वेळ मांडीशील हास्यरुदना ? ... २ प्रभूवीण सोय नसे, तुझे तुजलाहि दिसे, तरी का रे शुद्धीवरी अजून येशी ना ? ... ३ ------ ना.वा.टिळक ___________________________________________________________________________ ४०९ आधी क्षमाशीलता मग क्षमापात्रता आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायांपाशी ... १ क्षमाशील व्हावें क्षमेला पावावें, नेमियेला देवें न्याय ऐसा ... २ कोण्या तोंडे म्हणू , क्षमा मज कर, जरी दुज्यावर रोष माझा ? ...३ दास म्हणे, देवा, ऋणे सोडायाला आधी तूं मजला सिद्ध करीं ... ४ ------ ना.वा.टिळक ___________________________________________________________________________ ४१० आध्यात्मिक फलार्थ प्रार्थना एवढ्याच वेळेपुरते, दयाळा, चित्त दे मजला दयापूर्ण ... १ एवढ्याच वेळेपुरता सत्याला असूं दे वाहिला आत्मा माझा ... २ एवढ्याच वेळेपुरते कोवळे असो मन ओलें प्रेमे माझें ... ३ एवढ्याच वेळेपुरती आनंदे पूर्णही असूं दे मनोवृत्ती ... ४ एवढ्याच वेळेपुरता विनीत ठेवी मज शांत क्षमाशील ... ५ एवढ्याच वेळेपुरते माधुर्य दे, दे मज धैर्य, उदारता ... ६ एवढ्याच वेळेपुरते शालिन्य देई, तूं वदान्य विश्वी साऱ्या ... ७ एवढ्याच वेळेपुरती परार्थी अविच्छिन्न रती असो माझी ... ८ दास म्हणे, बापा, तूं तों दयासिंधु परी एक बिंदू पुरे सध्यां ...९ ------ ना.वा.टिळक ___________________________________________________________________________ ४११ मी एकटा नाही नाहीं मी एकटा कुठेही वसता कुठेही हिंडता पृथ्वीवरी ... १ तुन माझा सांगाती अगा माझ्या ताता माझा संगोपिता माझ्यासवे ... २ काय मी चित्तवें तूंच माझे चित्त माझे उक्त कृत तुझें सारे ...३ सुखाचा दुःखाचा कालविला काला तुझ्यासंगे झाला गोड सारा ... ४ दास म्हणे बाप जवळ लेकरां कितीही इतरां दार वाटो ... ५ ----- ना.वा.टिळक ___________________________________________________________________________ ४१२ देवाजीचे चरण धरणे तुझें तुला रूप पहायाचें काय ? तरी धरी पाय देवाजीचे ...१ पुढल्याचे आज व्हावे का दर्शन ? धरी रे चरण देवाजीचे ... २ चाललेली घडी व्हावी का बोलाया ? तरी देवराया शरण जा ...३ काय नीट व्हावा गेल्याचा निकाल ? तरी टेंक भाल देवापुढें ... ४ दास म्हणे ख्रिस्तासमेत प्रार्थना करून पहा ना एकवार ? ... ५ ----- ना.वा.टिळक ___________________________________________________________________________ ४१३ प्रभू ख्रिस्ताशी केलेली बेइमानी आहा प्रभू , ज्याने असे केले तो मीच जाण ! ...ध्रु मारिले फटके तुजला कसोनि, असतां तूं प्रिय भगवान ! ... १ तुज सोंग कैसें दिधलें नृपाचें, केला निंदूनि अपमान ! ... २ ताव हाती पायी खिळे ठोकिले तें किती झाला व्याकुळ प्राण ! ... ३ पाणी न देता कडू आंब दिधली, तुजला लागली जै तहान ... ४ अशीं सर्व दुःखें सोशियलीं तूं , त्यांचेहि मी मूळस्थान ... ५ आताहि तुजला बहू दुःख देतों, मी मित्र कसा बेइमान ! ... ६ ----- कृ. र. सांगळे ___________________________________________________________________________ ४१४ मनुष्याची स्वार्थांधता माझें, माझें, माझें, सारें माझें, माझें ! केव्हा देवा, तुझें ठावें कोणा ! ... १ माझ्यावर माझी आहे बहू प्रीती, तुझ्यावर किती ठावें कोणा ! ... २ जग व्हावें मला, स्वर्ग व्हावा मला, काय व्हावें तुला ठावें कोणा ! ... ३ दास म्हणे , माझें माझें करितांना पाय नर, जाणा कालाननीं ... ४ ---- भा. कृ. उजगरे ___________________________________________________________________________ ४१५ सद्गुणप्राप्त्यर्थ प्रार्थना प्रभुऱे, मला असे गुण लाव लाव रे ...ध्रु निती, दया, प्रीती, नम्रताही, भीती, यांचा मला पढो खरा डाव रे ... १ शास्त्र, भक्ती, स्तुती, कीर्तनावडी ती, यांची मला सुटो बहू हाव रे ... २ दमन इंद्रियांचे प्रार्थना करोनि, भावेंच मी धावेन हि धाव रे ... ३ मृत्युदरीतूनि पार नेऊनियां, देशी अंती निजपदीं ठाव रे ... ४ --- कृ. र. सांगळे ___________________________________________________________________________ ४१६ दुर्वासनांचा उच्छेद फुटोत हे डोळे, होवोत पांगळे पाय, हाथ लुळे, देवबापा ... १ झडो हि रसना, वेढ लागो मना, परी दुर्वासना नको नको ... २ माझें मजलागिं बघू दे मरण , घेऊ दे खिळून खांबालागी ... ३ देऊं दे मजला मला मूठमाती, गती यापरती दुजी नाहीं ... ४ कंटाळलो, बापा, निवारीं सांकडे, दयाळा, एवढें, लेकुराचें ... ५ दास म्हणे, म्हण मेल्याविण कोणा स्वर्ग गवसेना, हीच खरी ... 6 ----- ना.वा.टिळक ___________________________________________________________________________ ४१७ प्रभूसेवेतील स्वतंत्रता प्रभूच्या इच्छेला वाकलेली मन, त्याचा माझा मान एक झाला ... १ प्रभूची आसवें माझ्या डोळियांत, वाणी हि मुखांत त्याची वसे ... २ त्याच्या नियमांचा जीव हा बनला इच्छा तो कशाला मोडी माझी ? ... ३ स्वतंत्र, स्वतंत्र, मजला स्वतंत्र, करिते सर्वत्र सेवा त्याची ... ४ ---- दे. ना. टिळक ___________________________________________________________________________ ४१८ पूर्ण स्वातंत्र्य तुवां निर्मियेले असंख्य कायदे, आनंदे पाळू दे तेच मला ... १ तुवां लाविलेल्या असंख्या कर्तव्यां आनंदे कराया धावो जीव ... २ तुझया पाठीमागे माझा जीव लागो, बाकी आग लागो, सर्वस्वाला ... ३ बनलो देवाच्या गुलामांचा दास, काय स्वातंत्र्यास आतां कमी ? ... ४ ---- दे. ना. टिळक ___________________________________________________________________________ ४१९ देवाचे मंदिर देऊळ अंतरीं तुझे घरीं दारीं, शेजारीं, बाजारीं, राजद्वारीं ... १ भेटतील भाई, भेटतील ताई देउळें भव्य हीं, बाप्पा, तुझीं ... २ कृतींत, मातींत, सर्व प्रतीतीत देऊळ नितांत रम्य तुझें ... ३ सर्व लाभालाभ, सर्व जयाजय तुझें देवालय सुखें दुःखें ... ४ आठवत नाहीं पुढे आठवेल सुंदर देऊळ तेंहि तुझें ... ५ दास म्हणे, बाप्पा, एकदां दिसलें तेंच दिसलेलें राहो आतां ... ६ -------- ना. वा. टिळक ___________________________________________________________________________ ४२०. हृदयमंदिराचे वर्णन सुंदर देऊळ हृदय हें माझे, येथेंच विराजे देवबाप ... १ समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी ... २ प्रवृत्तीचें पीठ उभा तयावरी उपदेश करी पवित्रात्मा ... ३ सारा येशू ख्रिस्त भरुनी उतरला, आतां ह्या देऊळा भय कैचें ... ४ दास म्हणे, येथे अवघी मंडळी भजाया जमली देवबापा ... ५ -- ना. वा. टिळक ___________________________________________________________________________ ४२१. संकटसमयी प्रार्थना प्रभो, दीनाचा एक तूच वाली, कोण तुजविण मज अशा कठीण कालीं जरी ऐकशीना करुण रडें याचें तरी, देवा मी पाय धरुं कुणाचे ... १ महापापी मी खरा, प्रभो, आहे, परी तुजपाशीं क्षमानिधी राहे, शरण आलेल्या मला एक बिंदू प्रभो, दे दे दे शीघ्र, दयासिंधु ... २ बघे मागे दावाग्नी घोर ठेला, पुढें पाहें तों आढ खोल आला, दोन बाजूंना व्याघ्र मृग जसा तो तसें झालें मज धाव जीव जातो ... ३ क्षुद्र मानव मी धैर्य किती माझें मला सावरिती एक पाय तुझें बाळ मरताही मातृकडे पाहें, मनीं त्याच्या विश्वास तिचा राहें ... ४ मला सोसेना मुर्तनरकवास सिद्ध याहून मी साच मरायास दास येशूचा मरून काय होणे सुखें स्वर्गीं तत्संगमी रहाणे ... ५ तुझे मजवर उपकार ते अपार स्मरून होतों मी ऋणी फार फार किती मजवर संकटें घोर आलीं, तुझ्या लीलेने सर्व दूर झाली ... ६ तुझा सारा आधार, विश्वपाला अर्पिले तू आम्हांस निजा बाला नसे माझी योग्यता परी तारी, तया ख्रिस्तास्तव संकटा निवारीं ... ७ --- ना. वा. टिळक ___________________________________________________________________________ ४२२. संध्याकाळची प्रार्थना असो क्षण, असो घटिका, किवां दिवस असो तो तुझा, उसना मजला दिलास, देवा, नाही नाही माझा, परत तुला देतो दिन हा वापरीला ताव तो ... १ विचार केले आज, दयाळा, उच्चारही जे केले, जगी आज आचार जेवढे माझ्या हातून झाले त्यांसह दिवस तुला अर्पी , स्वीकारी ह्याला ... २ मलिन जाहला असेल दिन हा त्याची क्षमा असावी, क्षमाशीलता इतरांविषयी आधीं मजला द्यावी, बापा प्रेमनिचे, थोडे प्रेम मला दे दे ... ३ जरी चांगले झाले काही हस्ते आज, दयाळा, तरी तूंच ते केले, गौरव साजे अवघे तुजला, निमित्त मज केले , तूं निजकार्या साधिलें ... ४ रोज रोज ताव उपकारांची राशी वाढत जाई, दीन लेंकरूं तुझे कसे हे होईल ब उतराई बापा, हें घे रे माझें तनमनधन सारे ... ५ बापा, पुत्रा पवित्र आत्म्या, अगा अनन्या देवा, दिवस तुझा, तव रजनी दोन्ही करिती तव हि सेवा, जागे निजलेले आम्ही आश्रित तव सगळे ... ६ --- ना. वा. टिळक ___________________________________________________________________________ ४२३. ईश्वरभक्तीची वेळ भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल, मी टाकीं चिंता सगळी व जय बापाजवळी ती संकटाच्या समयिं देईल शक्ती हृदयी, तैं मोहपाशहि टळेल, आमोल्य ती भक्तीची वेळ ... १ भक्तीची वेळ, भक्तीची वेळ हि गोड, कैशी वर्णवेल करी मला ती प्रेरणा, देवा, मी,अर्पी प्रार्थना त्या ठायिं भाव ठेवुनी व भार सर्व टाकुनी कृपा अनंत तै मिळेल हि धन्य हो भक्तीची वेळ ... २ भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जिवा आधारहि लाभेल देहातुनी सूटूनियां जाई वरी चढुनीयां पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना, तैं जयकार हो गर्जेल, सफळ हि भक्तीची वेळ ... ३ --- मेरी. इ.बिसल ___________________________________________________________________________ ४२४. योग्य मनोवृत्तीने भक्ती करणें हे देवा व्यर्थ कल्पना शिरो न हृदयीं सुचाव्या योग्य भावना या भक्तिसमयी मला मना तूं दिधलें तें ध्यानी लावितो अनंत प्रेम दाविले ते आता स्तवितों ... १ माझ्यावरी दुःखें येति तीं तूची योजीशीं, सुखें जी काही लाभती तूं तिहीं देतोसी, संतुष्ट मी होतों जेव्हां तुला तै स्तवावें, व दुःख जै मला होई तुला तै सांगावें ... २ कृपा तुझी मी पावुनी स्मरेन ममता, विपत्ती येता पाहुनी धरीन धिरता येवोत दुःखेही अपार भीती न वाटणार देवा तूं नित्य आसरा, मी शांत राहणार ... ३ --- एच . बॅलेनटाइन ___________________________________________________________________________ ४२५. एकांतसमयीची प्रार्थना भ्रांत जिवा, आतां फिरे, हे मोह, हीं सुखे सोडी एकांतीच्या स्थळी शिरें प्रार्थी देवा, चित्ता ओढी ... १ हे प्रभो, या गुप्तस्थाना स्पष्टपणे विलोकिशी, मी करी तुझिया ध्याना तैं येई बोले मानसी ... २ मदहृदया शोधुनियां पाडी सच्छास्त्रतेजाला, घालवुनी कुवासना देई मनाला शुद्धीला ... ३ त्या अमिता प्रेम वर्षी अंतरी तुझिया देवा सद्गुण तत्प्रभावाने येऊ मनीं, जनीं सेवा ... ४ ---- एमिली आर. बिसल ___________________________________________________________________________ ४२६. आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणे जसा मी आहे निराधार आलों तसाच, दे उद्धार, कीं वाहे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा ... १ आलों तसाच, करूं काय व्हायास शुद्ध हीनोपाय, तुझेंच रक्त दे सहाय देवाच्या प्रिय कोकरा ... २ आलों तसाच, भ्रांती फार, हांवा जगांत दुर्निवार, घेरिती संकटें अपार, निवारीं प्रिय कोकरा ... ३ आलों तसाच, आंधळा, दुःखी, दरिद्री, दुबळा, साठा तुझाच सगळा, पुरिव प्रिय कोकरा ... ४ अशास तूं स्वीकारीशी, क्षमा सप्रेम करिशी, कि बोलणे न मोडीशी, देवाच्या प्रिया कोकरा ... ५ तुझया प्रेमेंच जिंकिले, या हृदयास चेचिले, अतां मी सर्व सोपिलें तुला, हे प्रिय कोकरा ... ६ --- मेरी ई. बिसल ___________________________________________________________________________ ४२७. इतरांबरोबर देवाने आपणावरही कृपा करणे प्रभू , ठायी ठायी पुरी, ये कृपेस वर्षंवी, सर्वा देशी तैं उरेची, माझी तान्ह भागवी, माझीही माझी तान्ह भागवी ... १ बा देवा, दुरी न टाकी हा महान पातकी आहे अनुतापी, पाहीं, घालवी न नरकीं ह्या मला घालवी न नरकीं ... २ तूं , प्रभू मला न सोडी, हात घट्ट धरिला, जी कृपा तुझी मधुर, देई, देई ती मला ती मला देई देई ती मला ... ३ हे सदात्म्या, न सोडी राही राही अंतरी तो समर्थ शब्द बोले, चित्तशुद्धता करीं, माझीही चित्तशुद्धता करीं ... ४ गुंतलोच पापमोहिं सौख्यस्थान सोडूनि, मोहपाश यांतुनीही तारी, तारीं धुंडूनी तू मला तारी, तारीं धुंडूनी ... ५ देवप्रीती निश्चला ती, सत्कृपाही येशूची, शक्ती ती सदात्म्याची हि मिळाली, पुरेची, हि मला हि मिळाली, पुरेची ... ६ रक्षीं, पाळीं, हे कृपाळू घे मला तूं सानिध्यी पापमुक्त दे, दयाळू चित्ततृप्ती हो तधी, माझीही चित्ततृप्ती हो तधी ... ७ --- मेरी ई. बिसल ___________________________________________________________________________ ४२८. प्रार्थना कशी करावी एकांती जा सकाळी, तसा दुपारीहि तसेंच संधीकाळी, फिरुनी, रात्रींही मनांतुनी टाकुनी विषयवासना विनम्रता धरोनि करींच प्रार्थना ... १ तुझे सुप्रीय मित्र यांसही माग दान संपूर्ण द्वेषपात्र यासाठींहि कल्याण स्वपाप आठवूनी प्रभूपदीं लागें तयास विनवुनी अनुग्रहा मागें ... २ जरी एकांती जाणे न होय तुजला तरी करी विनंती मनीच येशूला प्रभू कृपेस वर्षी, असेंहि तो ऐके कधी न तो धिक्कारी, शोधाच, सांपडे ... ३ हि प्रीती केवढी हि करी परेशा तो कीं आम्ही जेवीं बाळें तयाशीं वागतो विपत्तिकाळ येतां तयास आळवी सुखीही त्याच ताता मनांत सांठवी ... ४ --- --- एच . बॅलेनटाइन