मराठी
४२९. ईश्वरासन्निध असणे
येऊ दे जवळी
तूं जवळी
शिक्षाही देउनी
घे जवळी
हे देवा, देवळी,
येऊ दे जवळी, तूं जवळी ... १
कीं वाटे लागता
अंधार गाढ
उशास मिळता
केवळ दगड
तूं स्वप्नी आढळी
येऊ दे जवळी, तूं जवळी ... २
याकोबासारिखा
दे मला भास
शिडीने नेटका
मार्ग स्वर्गास
दूतांची मंडळी
नेवो तुजजवळी , तुजजवळी ... ३
पुढें मी उठुनि
तुला स्तवीन,
धोंडा उभारुनी
कृपा वर्णीन
त्या प्रिय बेथेली
येऊ दे जवळी, तूं जवळी ... ४
कीं हर्ष करितां
चढेन वर,
सूर्य ओलांडितां
काढीन स्वर,
गाईन आभाळी,
येऊ दे जवळी, तूं जवळी ...५
--- --- एच . बॅलेनटाइन
___________________________________________________________________________
४३० ख्रिस्ती मनुष्याचा आश्रय
प्रचंड वायू वाहतां
भयें मनास ग्रासितां,
मिळे नतास आसरा
पित्यासमीप तो खरा ... १
अनन्य सौख्यधाम तें,
सदैव येशू हो तिथें
जनास हर्ष देतसे,
पित्यासमीप तो वसे ... २
सुयोग मित्र पावती,
सुखें तयांस लाधती,
असोत दूर ते किती
पित्यासमीप भेटती ... ३
तिथें, तिथें, वरी वरी,
उडो विहंगमापरी
तिथें कशास धातुके
कुठुनी मोह पातकें ... ४
बघून आपणा स्वयें
सहर्ष दिव्यलोक ये
करावयास स्वागता
पित्यासमीप नांदता ... ५
दयासनास वैभवें
चढेल तेज हो नवें
बघून आपणाप्रती
दिसेल रम्य ते किती ... ६
---- ना. वा. टिळक