मुक्तीची याचना

मराठी

४३१ मुक्तीची याचना हे जिवा, धैर्य घरी, आग्रहें अर्जी करीं येशूपाशीं, तो म्हणे, मागें, मी ऐकें जाणे ... १ जिवा, राजा थोर तो, हाती सृष्टी झेलितो, श्रेष्ठ दाता दे मुलां, श्रेष्ठ दाना सकलां ... २ प्रभो ख्रिस्ता, पापभार जाची मला फार फार, मुक्त तू मला करीं, देईं शुद्धी अंतरीं ... ३ मी साष्टांगें नमितों, क्षमा, मुक्ती याचितों, मन्मनीं वस्ती करीं, ये प्रभो, सत्ता धरीं ... ४ --- --- एच . बॅलेनटाइन ___________________________________________________________________________ ४३२ ख्रिस्तसेवेंत आयु:क्रमण जगणे ख्रिस्त हें, मृत्यू हा लाभ तो, ख्रिस्ताचा क्रूस वाहुनी दुःखांत हर्षतों ... १ यात्राही कंठितों स्वर्गगेहातें मी, मी डेरा रात्री देउनी चढतो रोज मी ... २ ख्रिस्ताचा मार्ग मी निवडी चालाया, हो अति दुःख हानी ज्यां विजय सौख्य तयां ... ३ प्रभात पर्वती खोऱ्यांत फांकते, जव प्रकाशीं जाई मी छायाही संपते ... ४ यात्रा हि संपता सामग्री मी टाकी, इहपाशें न भुलूनी मुकुट मिळवी ... ५ विश्वासू राहुनी ऐकावी वाणी ती, बाळा तूं ये गृहीं हर्षें शाश्वत हि वस्ती ... ६ ---- सु. वि. करमरकर ___________________________________________________________________________ ४३३ चिंता करणारा येशू येशू माझी करी चिंता, खरा दीनबंधू तो, समदुःखी मशीं होतां माझे ओझें वाहे तो ... १ प्रिय त्याच्या सहवासें तृप्ती होई मजला सुख नाहीं जगिं तैसें, तो आधार जीवाला ... २ मला त्याच्या छायेखाली भीती नाही शिवणार सर्व दुःखे दूर गेली, मणी हर्ष होई फार ... ३ मजसाठी तो मध्यस्थी पितयाशी करितो, ढळेनाची येशूप्रीती, मी तयाला वानितों ... ४ मज तो येईल न्याया, वाट त्याची पाहतों, तरी तुष्ट मी रहाया, स्तुती गात चालतो ... ५ ----- मेरी ई. बिसल ___________________________________________________________________________ ४३४ प्रार्थनेची आवड दिवस जातेसमयी जावे एकीकडे, भक्ती करावी विनयी हें मज आवडे ... १ पापें देवा कळवुनी रडावें, त्यासमोर, उक्ती प्रभूची स्मरुनी मागावी कृपा थोर ... २ ईश्वरीप्रेमा स्मरुनी त्याचें स्तवावे नाव, त्यावरी चिंता टाकुनी ठेवावा पूर्ण भाव ... ३ पाहावें कि स्वर्गाकडे विश्वास धरुनी, हे सर्व फार आवडे या मृत्यूभुवनीं ... ४ माझें आयुष्य संपतां सच्छन्ति लाभो फार, पुढें स्वर्गांत राहता रात्र नाहीं येणार ... ५ --- --- एच . बॅलेनटाइन ___________________________________________________________________________ ४३५ रात्रीची प्रार्थना प्रिय प्रभू, हे तारका, तूं मला सूर्य सेवका, ऐहिक मोह, चिंता ह्या नसोत तेज झांकाया ... १ राहीं तूं माझ्याजवळी, दिवसां रात्री सांभाळी, कीं प्रिय प्रभू नसता, जीवास घोर वाटता ... २ हे प्रभू , कोणी दिसला भ्रमलेला कीं उधळा, त्या अनुतापी पाहुनी करीं कृपा स्वीकारुनी ... ३ पुरवीं शक्ती अशक्तां, आरोग्य देइ पीडितां, दुःखिती तूं दया करीं, दे झोप त्यां, श्रमा हरिं ... ४ निद्रा या रात्री लागणार तै सुचो हे मना विचार, कीं मी येणाऱ्या त्या दिनी राहिन ख्रिस्तसदनी ... ५ पुन्हां प्रभातीं उठुनि, मागू प्रसाद गाउनी, हें भवदुःख संपतां घे जवळी कृपावंता ... ६ ----- मेरी ई. बिसल ___________________________________________________________________________ ४३६ प्रभूसहवासार्थ विनंती धावत आली बघ रजनी, ध्वात जगा टाकीत भरुनी, धावत ये तूं झणि, सदया, ये, प्रभू , मजसह राहाया ... १ साह्य न कोणी जगिं उरला, एक सुखाचा रज नूरला ज्यास तयाच्या प्रिय सख्या ये, प्रभू, मजसह राहाया ... २ दर्शन किवां वाचन पुरे मी कधीं ऐसे म्हणत न रे, ह्या पतिता मानून अपुला दे मधू निजसहवासाला ... ३ ह्या जगतींची मग वसती, स्वप्नीच सौख्यें, विभवत्ती, स्थैर्य न काडीभर जगता, एक अढळ जगी तूं , ख्रिस्ता ... ४ बंधू सखा तूं जवळ तरी दुर्बल माझे सकल अरी अश्रू कशाचे भय कसले दिन मरण मरुनी गेलें ... ५ मी तवसंगे जगदवना, झाकीन अंती मम नयना, रात्र सरोनी दिनसमया पाहीन घर हद्दीं दीना या ... ६ --- ना. वा. टिळक ___________________________________________________________________________ ४३७ रम्य रजनी रम्य निशा किती तुझ्यासवे विश्रांती अर्पिती तुझ्यासवे नक्षत्रमालिका अंधारीं दे सुखा मलकार्यसाधका तुझ्यासवे ... १ ध्यानस्थ जाहलें तुझ्यासवें, हे विश्व शोभलें तुझ्यासवें, मी मग्न चिंतनी, भावें क्षणोक्षणीं गातों निरध्वनी तुझ्यासवें ... २ आनंद जो दिनीं, तुझ्यासवें रात्रींही तो मनीं तुझ्यासवें रात्रीं, दिनीं, सखा, तूं एकसारखा दे राहूं , तारका, तुझ्यासवें ... ३ --- ना. वा. टिळक