सायंकाळची प्रार्थना

मराठी

४३८ सायंकाळची प्रार्थना सूर्य मावळुनी गेला, आतां अंधकार झाला देवा, तुझी मोठी प्रीती, नित्य उपकार किती आजी बहू पापें वेलीं, माझी वेळ व्यर्थ गेली बापा, मला क्षमा करीं, कृपा करीं माझ्यावरी ... १ निद्रावश रात्र सारी होई मी तेव्हा तूं तारी तुझी प्रीती जागणारी, मला दीना पाळणारी सोडुनियां सारी भीती निजतों मी जगत्पती प्रत:काळी तुझी, देवा, मी करीन स्तुती सेवा ... २ ---- जे. मरे मिचेल ___________________________________________________________________________ ४३९ प्रातःकालची प्रार्थना देवा, तूंची राखिलेंसी, रात्रभरी पाळिलेंसी, तुझा होतों मी आभारी, येति दुःखे, तूं निवारीं माझ्या चित्ती तेज पाडी, दुर्बुद्धीना काढी, काढीं प्रभू येशू , ये उद्धरी, तुझया रक्तें शुद्ध करीं ... १ मीं जाणावी तुझी प्रीती, मीं करावी तुझी स्तुती, तुझयावाणी नम्र व्हावें, तुला नित्य आवडावे देवबापा व्हावे मान्य, पाळूनियां आज्ञा, धन्य, मला आणि माझ्या मित्रा दे उद्धार, देवपुत्रा ... २ --- --- एच . बॅलेनटाइन