मराठी
४४१ गृहप्रवेश
प्रवेश करितों नवगृहामाजी
तुझ्यासवे आजी, देवराया ... १
येथे राहुनियां सेवा तुझी व्हावी,
स्तुती आमहीं गावी देवराया ... २
सैतानाचा पाश सदा तूं चुकवीं,
सन्मार्गाला दावीं, देवराया ... ३
आशीर्वाद द्यावा नवगृहाप्रती
ऐक हि विनंती, देवराया ... ४
---- मी. बा. आढाव