४४२. कुटुंबासाठीं प्रार्थना

मराठी

४४२. कुटुंबासाठीं प्रार्थना विनवितों आम्ही आजी, प्रभुराया, आशीर्वाद दे या गृहालागी ... १ कुटुंबावरी या करीं कृपादृष्टी, सद्गुणांची वृष्टी सर्वांवरी ... २ जेथें जेथें जाती आम्हातूनी कोणी तेथें तुझी वाणी कानी पडो ... ३ पापापासूनिया राखी तूं अलिप्त करुनियां तप्त तदावेशें ... ४ गृही नची होवो भांडणांचें मूळ नाशी तूं समूळ दुर्बुद्धी ती ... ५ लेंकुरें आमुची वाढीव गुणांत चालीव कृपेंत नित्य तुझ्या ... ६ ख्रिस्ताच्या प्रकाशें जगातुनी न्यावे, स्वर्गसुख द्यावें अंतकालीं ... ७ ---- सु. वि. करमरकर