मराठी
४४३. कुटुंबातील अडचणी
दुःख रोग आम्हांवरी जेव्हां येति,
दाव तुझी प्रीती, प्रभूराया ... १
तैलाभ्यंग करीं पवित्र आत्म्यानें,
भरीं समाधानें आम्हां, देवा ... २
न्यूनता द्रव्याची पदे आम्हा जेव्हा
पेढीवरी तेव्हां येऊ तुझ्या ... ३
प्रसंग न येवो कर्ज करण्याला,
दूरी या मोहाला नित्य, प्रभू ... ४
सुखांत दुःखांत तुझीच लेंकुरें,
फुटू दे बा झरे सद्गुणांचें ... ५
वेष्टउनियां आम्हां ख्रिस्ताच्या प्रीतीनें
स्वर्गीय हर्षानें भरीं आज ... ६
---- सु. वि. करमरकर