मराठी
४४४. गृहप्रवेश
प्रभो करितों अजि गृह्प्रवेशाला
तुला वंदून, ईश्वरा जगत्पाला
तुधा आम्हां दिधलिस नवी सेवा,
शक्ती पुरवीं हि करावया, देवा ... १
उभयतांच्या आमुच्या मनीं राहीं,
तुझा अमुच्या अधिकार असो गेहीं
सुखी दुःखी आधार तूंच होई
अंतीं सनिद्ध आपुल्या, प्रभो नेई ... २
न हें अमुचें, गृहराज्य तुझें, देवा,
तुवां येथें आम्हांस दिली सेवा
तुझ्या आशेची सदा बांधलेलीं
ठेव आम्हां आपुल्या दृष्टीखाली ... ३
तुझी इच्छा सर्वथा आदरावि,
गृही अमुच्या तव उपासना व्हावी
तुझ्या भक्तांचा मान इथें व्हावा,
मिळो तिथें दुःखितांप्रती विसांवा ... ४
कुणी अतिथीं पातल्यामान त्याचा
घडो, विधवांचा, अन्य अनाथांचा
ख्रिस्तवृताची घोषणा हि घडावी
म्यतक येथें तव भूति सदा व्हावी ... ५
प्रेम नांदो, पावित्र्या इथें नांदो
तुझें इप्सित तें मात्र इथें साधो
तुझ्या सन्निधींचे दिव्य सौख्य लाधो,
अगा प्रेमाबधे, अगा दिनबंधो ... ६
तुला हितकर वाटेल तेच देई,
तुझ्यावाचून संपत्त्ती अन्य नाहीं,
पूर्व गरजा आमुच्या हव्या तेबी,
तुझ्या चरणीं संलग्न सदा ठेवी ... ७
प्रभो आम्ही जाहलों एकजीव
स्मरण ह्यांचे आम्हांस नित्य ठेव,
प्रभो ख्रिस्ताप्रीत्यर्थ दुर्बलांची
ऐक विनती नव वधूची वराची ... ८
----- ना. वा. टिळक