४४५. दुखणाइतांकरितां प्रार्थना

मराठी

४४५. दुखणाइतांकरितां प्रार्थना परमसमर्था, प्रार्थितो तुजला, रोगी मनुष्याला राख सुखी .. १ त्याचिं विघ्नें, दुःखें, संकटें हीं सारीं आणि जडभारी वारीं, देवा ... २ आजारांत त्यास शांति, समाधान, आत्मिक ते अन्न देई, बापा ... ३ आजारांत जरी केली कुरकुर तरी क्षमा कर ख्रिस्तासाठी ... ४ शय्येवरी त्यास सुखें गोड निद्रा, येऊ दे, ईश्वरा, रात्रभर ... ५ त्याजला होवोत आत्मिकानुभव, बसो दृढ भाव तुझयावरि ... ६ केलेली विनंती ऐक, दयावंता, वारी सर्व चिंता, देवबापा ... ७ ---- प्र. वि. गोर्डे