मराठी
४४६. प्रातःकाळची प्रार्थना
जागृत हो, मना, त्वरे,
भानूसवें तूं लाग रे
कार्यपथा क्रमावया
देवाची आठवी दया ... १
हे देवा, वंद्य तुझे नाम,
तुझें वर्णीन श्रेष्ठ काम,
मला तूं रात्री रक्षिलें,
नव्या दिना तूं दाविलें ... २
तुला सर्वस्व अर्पितों,
क्षमा पापांची भागतों,
रक्षीं मदीय मनोदय,
मला वाटो पापाचे भय ... ३
काय करुं ते सुचवि
नित्य मला तूं वागवी
मला तुझ्या सेवेला लाव,
मी गौरवावें तुझें नांव ... ४
--- --- एच . बॅलेनटाइन