४४७. देवाचे अनंत उपकार

मराठी

४४७. देवाचे अनंत उपकार हे देवा, तुझे उपकार अखंड प्रतिदिवशी दिवसां रात्रीं तू उदार, अनंत प्रेम दावीशी ... १ रात्रीं अंधार पसरून तूं माझा करिशी संभाळ रात्र सारे तैं उठतो, पुन्हा तूं देशीं प्रातःकाळ ... २ तुला मी प्राण अर्पितो, मला तुझ्या सेवेला लाव, हें आयु संपेपावेतों गाईन तुझा प्रेमभाव ... ३ --- --- एच . बॅलेनटाइन