मराठी
४४८ सायंकालची प्रार्थना
देवा, करुनियां क्षेम
तूं आजी दाविले प्रेम,
मला या रात्री सांभाळी,
स्वपंखाखाली तूं पाळीं ... १
जीं पापे केली ती सारी
येशूमुळें क्षमा करी,
कीं येणे मला निजतां
लाघे स्वच्छांती सर्वथा ... २
मला सद्बुद्धी शिकवी,
मृत्यूची भीती घालवी
तेणें ती अनंतकालींची
घडी वाटेल, निद्रेची ... ३
मी टेकितों तुझ्यावरी,
दे निद्रा तूं रात्रभरी,
मी प्रातःकाळी उठुनी
करिन सेवा फिरुनी ... ४
निद्रेमाजी, हे ईश्वरा,
ठेवीं प्रेमाचा पाहरा,
कुकल्पना तूं घालवीं
विचार शुद्ध सुचवी ... ५
पुढें निद्रा न लागणार
त्या सुदिनाची आशा फार
तैं दूतासंगे कृपा थोर
गाईन ईश्वरासमोर ... ६
--- --- एच . बॅलेनटाइन