येशू आमचा मेंढपाळ

मराठी

४५१ येशू आमचा मेंढपाळ येशू, प्रिय मेंढपाळा, पाळीं आम्हां कोकरां, ने तूं कुरणी आम्हांला, आणीं रक्षुनी घरा, प्रिय येशू, धन्य येशू , भय वारीं, हो थारा ... १ वाणी तव परिसोनि आम्ही अनुसरतो, दुरी दुरित करोनि, शोधी जैं बहकतों प्रिय येशू, धन्य येशू , ऐक आम्ही प्रार्थितों ... २ तुम्हां जवळीं मी घेई दीन जरि दुबळे, देशीं मधुवच नेई, राखीं प्रभू सगळे प्रिय येशू, धन्य येशू , तू स्वदुःखें तारिलें ... ३ व्हावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी, हे अनन्य गुरुराजा, प्रेमें मनें व्यापावीं प्रिय येशू, धन्य येशू , प्रीती आहे वाढावी ... ४ ------ एमिली आर. बिसल