४५२. कौटुंबिक प्रेम

मराठी

४५२. कौटुंबिक प्रेम गृहाप्रती ममता देई शोभा फार, प्रेम तेथें वसतां सुख नांदणार शांती तेथे राहती, तृप्ती तेथे नांदती, वेळ वेगे क्रमती, सर्व साधणार ... १ गृहीं जया ममता क्रोध न तिथें, प्रेम गृहीं वसतां न हेवा तिथें झोपडीत नंदलो दुःख हानी पावलो, प्रेमबद्ध राहिलों, सर्व साहवे ... २ गृहीं जरि ममता तरी जगता येई खरी रम्यता सुखदायीता ईश्वर हें पाहतां दाखवी प्रसन्नता राखीं म्हणे ममता ती संपन्नता ... ३ ----- मेरी ई. बिसल