४५४. आवाहन

मराठी

४५४. आवाहन केविं विभो, अबलां सांग साधे तुझी सेवा आम्हांप्रती जगीं, विश्वपाला ... ध्रु प्रेमस्वरूपा, प्रेम मात्र तूंतें ठावें, अबल सबल हा भेद न तूंतें, प्रणतजना तूं स्वीकारावें सदैव सेवा तुझीच घडू दे, विनंती हि तुला दयानिधे मनामधे तूंच राही वत्सला ---- ना. वा. टिळक ________________________________________________________________________________ ४५५. आवाहन सकाळ मनीं, प्रभू , झणीं येई, अतुल कृपा तव दावुनी प्रेमें जडीं मन तव ठायिं ... ध्रु अंतर थोर उदार करोनि ज्ञान तुझ्या वचनाचें आम्हां विपुल अजि देई ... १ मिळुनियां विनवितसों तुजला, त्वंनमहिन्याचें तेज पडों दे, प्रभुजी, मनीं राहीं ... २ ऐकुनी वार्ता तव प्रीतीची प्रेरित होवो मन हे सारे, देवा या समयी ... ३ तारणपूर्ती ख्रिस्ताकरवीं करुनि धन हे स्वर्गसुखाची, अंती वरी नेई ... ४ ------ सु. वि. करमरकर