मराठी
४५६. देवानें प्रसन्न व्हावें म्हणून प्रार्थना
भक्तां आजी पाव, प्रभूवर ... ध्रु
सकल सगुणनिधी असशी, बापा,
विनत म्हणून तव पायिं,
प्रिय भाजकजनंहृदयमंदिरी
क्रीडो येशूनाम, प्रभूवर ... १
अखिल विश्वकर्ता भर्ता तूं ,
विश्वासें मही गावो,
पापतापलय तिज करुनि दे
तव पादकमली ठाव, प्रभूवर ... २
तनमनधन तव नामप्रसारा
बहुमोदें अर्पिती,
सद्बुद्धीमान दे, सदया, त्यां
सदा सदा सुख दाव, प्रभूवर ... ३
----- ज. या. चौगुले