विश्रामवाराची उपासना

मराठी

४५७ विश्रामवाराची उपासना याहो, याहो, प्रियजन याहो जाऊ चला परमेश्वरसदनी भक्ती, शांति धरून मनीं सुंदर गायन गा वदनीं ... १ विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वरबाप पवित्र करी, परमकृपा मनूजी वितरी ... ध्रु घडीभर विसरून विषय जगाचें विमल मनें करू ध्यान तयाचें जगदीशां चे स्तवन करुं, जयजयकारें गगन भरू ... २ पुत्रक, कन्या, आपण सगळीं जमून रमू या पितयाजवळी राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मग ती प्रतिभा ... ३ देवाजीच्या वत्सलतेला, उपमा न जगिं उपकाराला स्मरुनी चित्तीं तें सगळें प्रेमाश्रूंची वाहू फुलें ... ४ सादर करू या सर्व विनंत्या ईश्वरबापा विश्वनियंत्या काय कुणाला व्हावें हें जाणत परमेश्वर आहे ... ५ तनु देवाची मन देवाचें धन देवाचें जीवित त्याचें अर्पित ज्याचें त्यास करुं, मीपण नूतन दिव्य वरू ... ६ पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक, अनुशासक अमुचा नित्य तयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयांत वसो ... ७ ----- ना. वा. टिळक