विश्रामदिन

मराठी

४५८ विश्रामदिन परमरम्य विश्रामदिन, काय देऊं या अभिधान ... ध्रु सप्ताहाचा मुकुटमणी अक्षयतेचा मुकूर जनीं, दिव्य पेटिका प्रीतीची, पूर्व भुक्तिहि मुक्तीची फिरे प्रहरभर ह्या धरणीवर स्वयें परात्पर, प्रहर, तोच हा बहुपुण्य, आनंदाचें समापन ... १ पूर्वसिद्धता हि पुढची, सप्ताहाची, जन्माची, भक्ती रसाचा झरा पहा नोहे, पुरच ह्याचा हा भेटायाचें परमात्म्याचें जीवात्म्याचें सुंदर एकांतस्थान, केवळ शांति सुखाधान ... २ आत्मपरीक्षण नांवाचें न्यायासन हें देवाचें सन्निधान हे आशेचें क्षमा, कृपा, शम, दम यांचें हें धरणीवर पवित्र सुखकर पित्याचें घर नरनारीचें सुखसदन जगिं न झाला उपमान ... ३ जाणें येणें ज्यावरून पवित्र असला सोपान स्वर्गघरेमकला मूर्त, सुंदरतेने परिपूर्त अवघे उत्सव, कौतुक गौरव गीतांचे रव ज्यांत सांठले, असा दिन, सर्व दिनांचा हाच इन ... ४ ---- ना. वा. टिळक