ख्रिस्ती मंडळींत प्रविष्ट होणार्याची विनंती

मराठी

४६२ ख्रिस्ती मंडळींत प्रविष्ट होणार्याची विनंती श्रांताला ह्या भ्रांताला द्या हो आश्रय तुम्ही मजला ... ध्रु पापदुःखमय पंथी फिरलों, सर्व जगाला पाहून आलों, ठाव न शांतीला, द्या हो आश्रय तुम्ही मजला ... १ प्रिय भक्तांनो न्या हो मजला पायिं देवाजीच्या द्याला, लावा सेवेला, द्या हो आश्रय तुम्ही मजला ... २ एकाकी मी नाहीं आतां, झालों तुमचा बंधू पुरता, मजला सांभाळा, द्या हो आश्रय तुम्ही मजला ... ३ तुमचा माझा एकच ईश्वर, एकाच तारक अपुला प्रभूवर, हेतू एक अपुला द्या हो आश्रय तुम्ही मजला ... ४ ----- ना. वा. टिळक