मंडळींत प्रविष्ट होणाऱ्याचें स्वागत

मराठी

४६३ मंडळींत प्रविष्ट होणाऱ्याचें स्वागत येई, येई, येई, सख्या बंधुराया, तुज आलिंगाया हर्ष वाटे ... १ आम्हांसारिखें तूं देवाचें लेकरूं, चाल आतां करूं सेवा त्याची ... २ ख्रिस्ताच्या सैन्याचा शूर तूं शिपाई, सैनिक आम्हीही सारे त्याचे ... ३ तुजला आम्हांला जाणें एका गांवा, आपुला विसांवा एक आतां ... ४ प्रीतीच्या राज्याची प्रजा आम्ही, तुंही आतां भेद नाहीं लेशमात्र ... ५ आपण अवघे जयजय करूं, सारें विश्व भरू हर्षघोषें ... ६ देवदूत गाती आमुच्या सांगातीं, पाहुनी संप्रती तुला येथें ... ७ जसा आमुचा तो तसा तुझा ख्रिस्त, तूं तो जीवन्मुक्त जाहलासी ... ८ ----- ना. वा. टिळक