४६४. बालकांचे समर्पण

मराठी

४६४. बालकांचे समर्पण पाहा प्रिय मेंढपाळ हातावरी घेई बाळ ... १ म्हणे येऊं द्या बालकां, त्यांना मना करूं नका ... २ बाळांतूल्य व्हावें साचे देवराज्य असल्यांचे ... ३ प्रिय प्रभू, दया कर, प्रेमें अर्पितों लेकरां ... ४ यांना प्रेमें अंगीकार, सदा रक्षण तूं कर ... ५ जरी झालीं हीं अनाथ, तरी हो बा ह्यांचा नाथ ... ६ इहलोकीं संभाळावें, सौख्यलोकीं गौरवावें ... ७ ----- एस. बी. फेअरबँक