मराठी
४६५ बाप्तिस्मा
प्रार्थना आमुची ऐक, दयावंता,
प्रसन्नहि आतां हो आम्हांला ... १
कृपा पूर्ण करीं धाडुनी सदात्मा,
जीवनी बाप्तिस्मा यांस द्यावा ... २
हृदयांत भरीं गुण, भक्तिभाव,
कपाळीही नाव लिही देता ... ३
नेहमीं संभाळी, सदा वागवूनी,
पाश, चुकवुनी राखीं ,देवा ... ४
रोगासंकटांत धरुनी उराशीं,
शेवटी स्वर्गाशीं घ्यावें वरीं ... ५
----- एस. बी. फेअरबँक