मराठी
४६६ त्रैक्याची प्रार्थना
बापा, तुझी कृपा अपार,
सप्रेम योजिशी उद्धार,
करीं, करीं क्षमा मला
अतां सदा स्तवी तुला ... १
पुत्रा, नृपा, दयाकरा.
हे तारका प्रेमागरा,
धरीं, करीं तारीं मला
अतां सदा स्तवी तुला ... २
सदात्म्या, मज्जीवना,
दे, नित्य ते साठोरणा
करीं विशुद्ध तूं मला
अतां सदा स्तवि तुला ... ३
अतर्क्य त्र्येक ईश्वरा
विश्वेश तूं , विशंभरा
खरां तूं आसरा मला,
अतां सदा स्तवी तुला ... ४
---- एमिली आर. बिसल