त्रैक्याची स्तुती

मराठी

४६७ त्रैक्याची स्तुती नमा पित्यास गौरवा म्हणा तया महान कृपा त्याची गाजवा, तो वंद्य भगवान ... १ नमा, पुत्राप्रती भजा करी सदा कल्याण, उद्धार देई, घेऊं तो, तो वंद्य भगवान ... २ नमा, सदात्मया भजा, कृपेचें देई दान, पवित्र तो करी मना, तो वंद्य भगवान ... ३ त्र्येका नमा, सद्भक्त, या, अमोध, प्रेमवान, अनुग्रहा वर्णा अपार, तो वंद्य भगवान ... ४ ---- एमिली आर. बिसल