मराठी
४६९ ईश्वरी अनुग्रहार्थ प्रार्थना
प्रभू दया मागतों,
आम्ही पायां पडतों,
दूर नको घालवू
रितें नको पाठवू ... १
सारी आशा तुजवर,
तूं दयाळू कृपा कर,
मागतों आत्म्याचे दान,
हृदयाचें समाधान ... २
ऐकें आतां प्रार्थना,
डावी मोठीं करुणा,
हि मिळालियाशिवाय
आम्ही आतां जावें काय ... ३
तुझें शास्त्र ठसूनि
राहो अंतःकरणीं,
प्रत्येकाला दे उद्धार,
हाच श्रेष्ठ उपकार ... ४
----- एच . बॅलेंटाइन