मराठी
४७२. भक्तहृदयीं ख्रिस्ताचें वास्तव्य
प्रभू, आतांच येऊनि
भक्तांच्या राहीं अंतरीं,
तेणें आनंद वाढवी,
पावू दे सौख्य ईश्वरी ... १
मनांतुनी घालिव घोर,
सामर्थ्य, धैर्य वाढवी,
कृपेची लांबी रुंदी थोर
आम्हां सर्वां, प्रभो, दावीं ... २
जो कल्पनेपलीकडे
क्षमा कराया शक्तिमान
त्या वंद्य ईश्वराकडे
पाहुनी देऊं त्यास मान ... ३
----- एच . बॅलेंटाइन