मराठी
४७३. देवाचें सर्वत्र वास्तव्य
ज्यांना भक्ती आवडे
देव येतो त्यांकडे,
कोठें जरी शोधिलें
तो सर्वत्र आढळे ... १
सुखसोई असतां
किवां हालही होतां
पहा ईश्वराकडे,
केव्हाहि तो सांपडे ... २
सर्व सुख संपती,
भयें दुःखे येताति,
तेव्हां पहा त्याकडे,
तो सर्वत्र सांपडे ... ३
माझ्या जीवा, जन्मभर
त्या बापाची आशा धर,
नित्य पाहा त्याकडे
केव्हाहि तो सांपडे ... ४
----- एच . बॅलेंटाइन