त्रैक्याची भक्ती

मराठी

४७४ त्रैक्याची भक्ती अहो स्तुती गा देवाची दया वर्ना, आम्हांला तो सांभाळितो, अहो स्तुती गा. पुत्राला नाही राखिले आम्हां ताराया धाडिले सत्प्रेमा दाविलें, अहो स्तुती गा ... १ अहो वंदा नाम, ख्रिस्ताची प्रीती वर्णा, पाप्यानां तो उद्धरितो, वंदा येशूनाम तो वधस्तंभी मारिला, पाप्यांचा दंड भरीला, उद्धार साधिला, वंदा येशूनाम ... २ अहो पापी या पवित्र आत्मा मागा, मनाला तो सुधारितो, अहो पापी या ईश्वर कृपा दाखवी, येशू प्रेमाने बोलावी सदात्मा सुचवी, अहो पापी, या ... ३ ----- एच . बॅलेंटाइन