मराठी
४७५ उपासनेला आमंत्रण
अहो भक्त, या,
भजा देवाला आतां
तो कृपावान, सामर्थ्यवान
अहो भक्त, या
करा बापाची प्रार्थना,
वर्णा प्रभूची करुणा,
मागा सत्प्रेरणा,
अहो भक्त, या ... १
अहो पापी, या,
नमा देवाला आतां
तो नीतिवान व दयावान
अहो पापी, या
तो आजी कृपा दावितो,
प्रभूही आतांपावेतों,
प्रेमें बोलावितों,
अहो पापी, या ... २
अहो सर्व, या,
करा देवाची भक्ती,
तो सत्यवान व प्रितिवान,
अहो सर्व या,
आयुष्य वेगें गुजरेल,
न्यायाचा काल पोहचेल
तों पापी घाबरेल
अहो सर्व, या ... ३
----- एच . बॅलेंटाइन