मराठी
४७६ विश्रामवाराची प्रार्थना
लोटुनी आठवडा
येई हा पवित्र वार,
आजी वंदूनि ख्रिस्ता
वर्णू त्याचे उपकार
हाचि आवडे सुदिन
अत्यंत विश्रांतीची खून ... १
आम्ही, देवा, लवूनी
ख्रिस्तनामें भाजतां,
तुन आम्हां स्वीकारुनी
दाखवी प्रसन्नता,
सोडवीं चिंतेचा भार,
शांती दे मना सुधार ... २
नाम तुझें गौरवीं
जैं भाजून स्तवितो
तैं स्वतेज दाखवीं,
दे आम्हां प्रसाद तो
स्वर्गलोकी जो उत्सव
दे तयाचा अनुभव ... ३
शास्त्रबोध बिंबवी
पाप तुन क्षमा करीं
सर्व भाका सुचवी
चितीं हर्षला भरीं
स्वर्गीं तुझियासमोर
गाऊं येशूकृपा थोर ... ४
----- एच . बॅलेंटाइन