मराठी
४७८ विश्रामवाराची महती
विश्रांतीवार येई,
आम्हाला हर्षवी,
चिंता व भार घेई,
सुंदर, तेजस्वी,
हे सान थोर सारें
दिनी या वंदितीं
त्रेक्यास, हर्षभरें
संगीतें अर्पिती ... १
प्रकाश निर्मियेला
देवानें या दिनीं,
उत्थान तरायाला
ख्रिस्ताचें या दिनीं
प्रवेश शुद्धात्म्याचा
जाहाला या दिनीं
ऐसा त्रिप्रकाशाचा
प्रसाद या दिनीं ... २
आजी उतरे मान्ना
श्रमी राष्ट्रांवरीं
पवित्र समाजांना
पाचारी तुतारी
जिथें सुवार्ता दीप्ती
प्रकाशें निर्मल,
तेथेंचि आत्म्या तृप्ती
दे प्राणदजल ... ३
नवीन नित्य पावूं
प्रसाद या वारी,
विश्रांती अंतीं घेऊं
मुक्तांसवें खरी,
वंदा पितापुत्राला,
शुद्धात्मयाला वंदा,
त्रेयकास गा स्तोत्राला,
हे मंडळी, सदा ... ४
---- सु. वि. करमरकर