४८1 विश्रामवाराची प्रार्थना

मराठी

४८1 विश्रामवाराची प्रार्थना हे थोर भगवान, तुझे पवित्र घर तुझ्या भक्तीचें स्थान हें किती मनोहर देवा, तुझ्या ह्या मंदिरीं मला दे भेट सत्वरीं ... १ पावावा जन्मवर लौकिक सुखभोग यापेक्षां दिनभर थोर तुझा संयोग भेटेन ईश्वरा, वदा, राहीन तेथें मी सदा ... २ जे नित्य देवळीं भजन करिती ते तुझयाजवळीं अति उल्लासतीं राहुनी तुझ्या मंदिरीं कृपा स्तविती ईश्वरा ... ३ ते धरुनी धीरा कांठीती भवरान, आनंद करुनि पावती सौख्यस्थान, तुझ्या घरांत वैभवी मला, हे देवा, पोंचवीं ... ४ ----- एच . बॅलेंटाइन