उपासनासमाप्ती

मराठी

४८२ उपासनासमाप्ती हे त्रात्या, जाण्यापूर्वी फिरुनी तुझें वाखाणू नाम मिळुनी, उपासनांती गाया उठतों, तैं नमूं आशीर्वाद मिळे तों ... १ जातांना घरीं शांती दे आम्हा, दिनीं तैसें रात्री संगें रहा येथें ये आजी स्तविताति नाम, रक्षीं तयांचें ओठ, अंतर्याम ... २ ह्या रात्री शांती दे प्रभू, आम्हां, अंधार करीं प्रभासा सर्वां रक्षीं स्वबालां, दुःखें भयें वार, तुला समान प्रभा अंधकार ... ३ आयुष्यभर शांती दे आम्हां, त्रासांत टेका हो, पट्टी दुःखा युद्धांतीं वाणी तव ऐकवीं, भोगाया नित्य शांती बोलावीं ... ४ --- जे. टेलर