४८४. प्रभुभोजन

मराठी

४८४. प्रभुभोजन पाप्यांस ख्रिस्त तारिता, दे अन्न जीवनी, जनास तो उद्धरिता अघा निवारुनी ... १ शरीर देईं आपुलें सप्रेम घेऊ तें रुधिर ओति, बंधूंनो, सभाव पिउ तें ... २ प्रभू , हें अन्न सेवुनि स्मरु तुला अतां, सदा तुझी घेऊं मनीं ती प्रीती, नम्रता ... ३ सेवुनि पेय आठवूं तुझी कृपा अपार, कीं मुक्तीं द्यावया रुधिर तूं बाहुं देशी फार ... ४ प्रभू , अमूल्य हा बळी तूं प्राण अर्पिला हि शक्ती, बुद्धी, सर्वही आम्ही अर्पू तुला ... ५ ---- एमिली आर. बिसल