मराठी
४८५ . प्रभुभोजन
दयाळू येशू आमुचा
प्रभू दिसें न नेत्रीं या,
अनेक नित्यचिंतनीं
सदैव सोपिलें तया ... १
जढा मनांस आमुच्या
जाणुनी नेमी हा संस्कार,
कीं आठवूंनियां तया
स्मरावे आमहीं उपकार ... २
स्वतांचं मेज मांडुनी
संतांप्रती संबोधी तो,
शरीर, रक्त दावुनी
खुणांस घेई, बोधी तो ... ३
इथें जगास विस्मरूं,
मनीं भरू प्रभुप्रेमा,
विनम्रता धरुं वरू,
करूं परस्परां क्षमा ... ४
या भोजन स्मरु सदा
असें करीं, कृपावंता,
तुझ्याशीं नित्य तूं जडीं
हीं आमुची मनें आतां ... ५
---- NO Name