मराठी
४८७. बालकांचे समर्पण
पहा, तो सौम्य मेंढपाळ
उभाच राहतो,
उराशीं घेई बालकां,
प्रेमाने बोलतों ... १
म्हणे, मुलांस येऊ द्यां,
करूं नये अव्हेर,
अशाच बालकांप्रती
मी देईं पूर्णोध्दार ... २
प्रभू, आम्ही हीं बालकें
प्रेमें समर्पितों,
तुझीचं मोजीं लेकरे,
हे मात्र मागतों ... ३
हि पोरकीं जरी होतीं
तूं यांस नाय थोर,
अकालीं मृत्यू ये तरी
नमूं तुझ्यासमोर ... ४
--------एमिली आर. बिसल