मराठी
४८८. बाप्तिस्मा
हे येशू , ऐक प्रार्थना,
सदात्मा धाडुनी
दे यास अंतःकरणीं
बाप्तिस्मा जीवनी ... १
याच्या मना नवें करी,
दे यास भक्तीभाव,
तूं सद्गुणा हृदीं भरीं,
लिही कपाळीं नांव ... २
याला कृपेंत वाढवी
संरक्षणा करीं,
ऐहिक पाश चुकवीं,
अंती घेई वरी ... ३
----- एच . बॅलेंटाइन