४९०. देवाची समक्षता

मराठी

४९०. देवाची समक्षता परमात्मन, परमसुखद तव समक्षता नित्य असो प्रणतजनीं, परमसंगता ... ध्रु जगिं हनोख तव सांगें नित्य चालला नच मोशे सोडुन तुज अल्प हालला शब्द तुझा युक्त तुशीं ख्रिस्त शोभला, आशीर्वच हेंच मला दे, विभो, अतां ... १ कवणाचा तुजविण मी आसरा धरुं योग्य न मी जरी, सदया तुझें लेंकरूं, ख्रिस्तास्तव दूर तरी मज नको करूं सन्निध मज तूं अपुल्या होईं ठेविता ... २ तुजविण मज शून्य विश्व भासूं दे मनीं, तू हृदयिं, बाहीर तूं, तूं जनीं, वनीं, तूं चिंतनी, तूंच सदा राहीं भाषणी पावो मम सौख्य सफळ ह्यांत पूर्णता ... ३ ----- ना. वा. टिळक