मराठी
४९१. ख्रिस्ताचें आणि भक्ताचें नातें
जशी सारंगी आणि कर नराचा,
जशी अथवा संकल्प आणि वाचा,
जशी सौरभ नासिका, श्वास वेणू
तसे येशू मी, भेद नाही रेणू ... १
जशी आई बाळास दुर्बळाला,
मार्गदर्शी काननीं चुकलेल्या,
चलजज्योतीला स्नेह हो दिव्याचें,
तसा येशू चैतन्य मम कुडीचें ... २
पावसाळा वा जलाशया जैसा,
जसा पाण्याचा निधी आणि मासा,
जसा भास्कर संबद्ध हो दीनातें,
तसें माझ्या येशूचें मजशीं नातें ... ३
---- ना. वा. टिळक