मराठी
४९३. ईश्वरेच्छेची महती
प्रभूच्या इच्छे, नमन तुला घे,
यश तव गाते हि जगती,
तूं मम माता, तूं मम सारें
काय मला, आई, कमती
प्रतिदिन ताव मी प्रेम भोगींतों,
मती माझी त्वनमय होती,
सृष्टी हासती तुझ्या दर्शनें
देवदूत गाणी गाती,
सर्व आसवें त्या ख्रिस्ताची,
तछम सारे तुजवरती,
तूंच पूर्णता त्यांची तव गे त्या
तारकहृदयी वस्ती
तुझ्या हवाली मज करुनि,
स्वस्थ जाहला येशू धनी,
घे घे माझे मन हिरुनी,
जेणे होईन पूर्ण मोकळा बाळ
तुझा नि:शंकमती ... १
जेथें जेथे ह्या धरणीवर
पाय तुझे पडले दिसती.
सदये, मन्मती तेथें
रात्रंदिन लोभें रमती
राज्य तुझें गे किती मौजेचें
सुखास जेथें नाही मिती
तुझी कृपा मज पुरे
कशाची तुझ्यापुढे मग दुखताती
तवसंगे डोंगर चढलो
खाली किवां कोसळलो,
परंतु जरी मी तव झालों
तरी कशाची पर्वा करितो
प्रभूच्या इच्छे एक रती ... २
हात तुला घे पाय तुला घे,
वंदन तुला घे सुमती
हृदय तुला घे जीव तुला घे,
स्वतंत्रयाची हीच गती
कोण पुसे द्रव्याकीर्तीला
पापपांची शास्त्रें नुस्तीं
प्रभूच्या इच्छे घे घे सारें,
दे दे तव ठायिं प्रीती
सर्व जगाला व्याप कशी
तूंच जया माते सृजिशी
होईल जैसे तूं वदशी
पुरा तुझा मज करीं एकदां,
मग पृथ्वीचा स्वर्ग, सती .... ३
---- ना. वा. टिळक