४९५. निरिच्छ प्रेम

मराठी

४९५. निरिच्छ प्रेम स्वर्ग मिळाया मी न करीं, बा देवा प्रेम तुझ्यावरी नरक टाळाया वा न करीं, बा देवा प्रेम तुझ्यावरी ... ध्रु सदया येशो, खांबावरूनी आलिंगन दिधलें मजला, हातीं, पायिं खिळे साहिले मज पतितास्तव, हे विमला तव रुधिराचा घाम गळाला, वरीला मृत्यू कैवारी तूं माझा मी तुझा खरोखर या जन्मींचा हो वैरी ... १ स्वर्ग मिळाया, नरक टाळाया खटपट नाहीं माझी मुळी प्रेमासाठी प्रेम करितों हि माझ्या मनींची उकळी प्रभो दयाळा, नको उपायन, निरिच्छ देशील जरी, परी मागतों दान एक मी, प्रेम करुं दे तुझ्यावरी ... २ प्राणप्रियतम सखया माझ्या, करिन प्रेमा तुजवरती, जिव्हा माझी अखंड जाईल तव शिलाची मधू महती, माझा ईश्वर मला दिसे हो, माझ्या प्रभू ख्रिस्ताभितरीं राजांचा मम राजा एकच प्रेमळ, त्या मी नमन करीं ... ३ ---- भा. कृ. उजगरे