४९६. प्रभूच्या आधीन होणें

मराठी

४९६. प्रभूच्या आधीन होणें प्रभू मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा ... ध्रु तुझाच परी मी, घे घे माझी तनु, मन, धन, हि वाचा बंधमुक्त तूं केलें, मीना मज तूं निधी करुणेचा ... १ पापात्म्याची सह्या अधिकृती सांगू किती त्या जाचा सोडविलें तूं विषकिटा मज, सिंधू देशी अमृताचा ... २ हस्तपाद हीं पांच इंद्रियें, आत्मा प्राणहि यांचा तवाधीन बा झाला झाला प्रिय ताता प्रणताचा ... ३ ---- ना. वा. टिळक