मराठी
४९७. मुलाची विनंती
ख्रिस्ताचा मी शिष्य,
तुझें मी लेंकरूं
तुझी सेवा करू लागलेलें ... १
एक एक क्षण जिन्याचा माझिया
घे घे देवराया, मोजून तूं ... २
माझें जें जें तें तें
तुझेच दयाळा,
देऊं हे कोणाला तुजविण ... ३
घ्यावयास ह्याला हात घाली दुजा
तेव्हां हात तुझा पुढे येवो ... ४
चोराभामट्यांचा झाला सुळसुळाट,
घेरियेला हाट सारा यांही ... ५
देवा, माझा मला नाही रे विश्वास
तूंच जपण्यांस सिद्ध राहीं ... ६
बापा, तूं समर्थ, भिऊ मी कोणाला
कां गा मी चिंतेला वंश होऊ ... ७
दास म्हणे, मौज लेकुरपणाची,
सारी चिंता त्याची मायबापा ... ८
---- ना. वा. टिळक