४९९. प्रभूला अनुसरणे

मराठी

४९९. प्रभूला अनुसरणे माझे मागें तूं येई, त्यजूनि सर्वस्वा देईं ... ध्रु क्रुसखांब तव घेऊनियां रोज रोज ये वाहुनियां माझेपण सोडून देई माझे मागे तू येईं दानधर्म तव, विधीकर्मे तव नकोत मजला मुळी काहीं त्यजूनि सर्वस्वा देई ... १ राजथाट हा सोडूनि दे, धन गरिबाला वाटुनि दे भग्नहृदय तूं करुनि ये, माझे मागें सत्वर ये जरभरी वसने हींच भूषणे तव आभरणे टाकुनी मागें तूं येई क्रुसखांब हा तव घेईं ... २ सकल हृदानें करीं प्रीती, सकल मनाने धरीं चित्ती त्या हृदयेशा परमेशा, हीच जीवाची मधू आशा, मोठेपण तें खाली आणिते नरकीं नेतें नम्रत्वाने वर जाई, निवेश स्वर्गामधिं होई ... ३ मी मोठा, तो सान, असे भेद जयाचे मनीं वसे देशद्रोहीं समजावा तोच करंटा, अघठेवा सर्व जगत हें माझें आहे, भेदच नोहें तयांत वसती मम होई, स्वराज्यामधिं तो जाई ... ४ --- मी. वि. तर्खड