५००. छळणुकीत आदर मानणें

मराठी

५००. छळणुकीत आदर मानणें तव नामासाठी लागतात पाठीं तेणें तुष्टी मोठी माझ्या जिवा ... १ जीव हा रंगला तुझ्या ठायिं, ख्रिस्ता दुःख, भय अस्ता गेले सारें ... २ खांब उचलून तुझ्या मागें आला त्याने जिंकियेला सर्व लोक ... ३ शिव्या शाप थोडे कोरडे कीं शूळ व्यर्थ खड्गजाळ आम्हांपुढें ... ४ यारे छळा आम्ही गाऊं ख्रिस्तराया, पाप्याला ताराया मार्ग दावूं ... ५ ---- ना. वा. टिळक