मराठी
५०१. प्रभूपुढें भक्तीची योग्यता
तुझ्या तोंडावर थुंकले दुर्जन
मग मीच कोण मोठा आलो ... १
तुझ्या पाठीवर ओढियेले वेत,
मग ते नकोत मलाच कां ... २
लागे उचलावा तुझा तुला खांब,
मग मला थांब कोण म्हणे ... ३
तुझीया मस्तकी कंटकिरीट,
माझा थाटमाट हाच अंती ... ४
तुजला खांबाला खिळून मारिले,
मरण निराळें मला कैचें ... ५
दास म्हणे, सारा सुखाचा सोहळा
तूझिया निराळा होऊं न दे ... ६
---- ना. वा. टिळक