५०७. आत्मनिवेदन

मराठी

५०७. आत्मनिवेदन मन ऐकेना ऐकेना, दुर्विकारी केली दैना ... १ मन कोणाचें, कोणाचें देई देवाला देवाचें ... २ प्रभुमध्यें मन राहो, मनीं प्रभू घेवो ठावो ... ३ होऊं देवाचें लेंकरूं, मी, मी, करून नको मरुं ... ४ दास म्हणे तो मोकळा, प्रभूला जो वाहिलेला ... ५ ---- ना. वा. टिळक