५०८. आत्मसमर्पण

मराठी

५०८. आत्मसमर्पण अर्पितों प्रभूला सर्वच काहीं, त्वरेनें माझ्या मनीं तूं राहीं ... ध्रु संसार माझा समजुनी गमतों, निशिदिनिं खटपट त्याची मी करितों, तुझा मी आतां जाणुनी नमितों ख्रिस्ता, दयेनें दिनांस पाहीं ... १ बुद्धी जी दिली तूं माझीच वाटे गर्वानें फ़ुगूनी हृदय फाटे, शोकानें आतां कंठ हा दाटे, प्रभू मी पापी किती तूं साहीं ... २ किती मी हट्टी ऐकें न वाणी माझीच इच्छा नेहमीं वाणी सर्वचिं अर्पी आतां हा प्राणि तुजवांचूनियां कुणीच नाहीं ... ३ तनु हि झिजवीं तूझ्याची पायिं, मन हें लावीं तुझ्याची ठायिं धन हें खर्ची तुझ्याची कार्यीं सर्वस्व माझें तुलाच वाहीं ... ४ ----------------------- सु. वि. करमरकर